** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 7, 2021

आजअखेर 1 लाख 51 हजार 523 जणांना डिस्चार्ज

 


 

          कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3297 प्राप्त अहवालापैकी 3051 अहवाल निगेटिव्ह तर 235 अहवाल पॉझिटिव्ह (11 अहवाल नाकारण्या आले ). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 5240 प्राप्त अहवालापैकी 4793 अहवाल निगेटिव्ह तर 447 अहवाल पॉझिटिव्ह. (561 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 4192 प्राप्त अहवालापैकी 3420 निगेटिव्ह तर 772 पॉझीटिव्ह असे एकूण 1454 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 25 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

          जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 69 हजार 799 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 51 हजार 523 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 13 हजार 331 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

          आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1454 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-52, भुदरगड-40, चंदगड-42, गडहिंग्लज-73, गगनबावडा-5, हातकणंगले-126, कागल-78,  करवीर-259, पन्हाळा-84, राधानगरी-54, शाहूवाडी-23, शिरोळ-116, नगरपरिषद क्षेत्र-130, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 351, इतर जिल्हा व राज्यातील-21 असा समावेश आहे.

          आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-4396, भुदरगड- 4510, चंदगड- 3519, गडहिंग्लज- 6076, गगनबावडा- 670, हातकणंगले-18645, कागल-5947, करवीर-25188, पन्हाळा-8756, राधानगरी-3975, शाहूवाडी-3945, शिरोळ- 10450, नगरपरिषद क्षेत्र-18656, कोल्हापूर महापालिका 46 हजार 650 असे एकूण  1 लाख 61 हजार 386 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 413 असे मिळून एकूण 1 लाख 69 हजार 799 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 69 हजार 799 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 51 हजार 523  रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 945 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13 हजार 331 इतकी आहे.

00000

0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.