कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत
मोफत रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवार दि. 8 जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या
हस्ते ऑनलाईन होणार असल्याची माहिती
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक
आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.
यामध्ये जिल्ह्यातील
प्राधान्याने राजर्षी
छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे Phlebotomist या jobrole चा
समावेश आहे. या योजनेतंर्गत 36
jobroles पैकी 17 jobroles चे प्रशिक्षण जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रूग्णालयामार्फत दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य
विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध
व्हावे तसेच जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील
रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या किंवा यापूर्वी आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या 18 ते 45 वयोगटातील
बेरोजगार युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक
हेल्थकेअर वर्कर इ. क्षेत्रामधील विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण प्रदान करून,
त्यांचे कौशल्य विकसित करून
त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये प्रमोद
महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) अंतर्गत मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य
विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार
आहे, असेही श्री.
माळी यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.