** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 22, 2021

107 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1425 क्युसेक विसर्ग

 

AT 4.00 PM

                

          कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 174.83 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचनवाडी, चांदे व भाटणवाडी. कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे, वेतवडे, आसळज,  मांडूकली व सांगशी. धामणी नदीवरील- पनोरे, गवसी, म्हासुर्ली, सुळे  व आंबर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदीवरील- सिद्धनेर्ली, सुळकुड बाचणी, दत्तवाड, सुळंबी, तुरंबे व कसबा वाळवे. वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, करडवाडी,  शेणगाव, शेळोली, कडगाव, सुक्याची वाडी, तांबाळे, अनप व दासेवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, चांदेवाडी, देवर्डे, दाभीळ, हजगोळी, जरळी, हरळी व भादवण. घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, पिळणी, बिजूर भोगाली, हिंडगाव,तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील- कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी व हल्लारवाडी, चित्री नदीवरील- कारपेवाडी, चिकोत्रा नदीवरील- कासारी, वडगांव, अर्जुनवाडा, मेतके व गलगले असे एकूण 107 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 67.21 दलघमी, वारणा 838.32 दलघमी, दूधगंगा 430.43 दलघमी, कासारी 61.71 दलघमी, कडवी 59.59 दलघमी, कुंभी 63.95 दलघमी, पाटगाव 81.42 दलघमी, चिकोत्रा 27.60 दलघमी, चित्री 41.47  दलघमी, जंगमहट्टी 18.04 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, आंबेआहोळ 21.84, कोदे (ल.पा) पुर्ण क्षमतेने भरला आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 39.6 फूट, सुर्वे 37.6 फूट, रुई 65.6 फूट, इचलकरंजी 60 फूट, तेरवाड 53.4 फूट, शिरोळ 44 फूट, नृसिंहवाडी 44.10 फूट अशी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.