** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 15, 2021

ई-आर-1 विवरणपत्र भरण्याचे आवाहन

 


        कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जून 2021 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 विवरणपत्र सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची, मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष / स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे.  ही माहिती 31 जुलै पर्यंत या विभागाच्या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

या कार्यालयाकडून या पूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन अंगीकृत व राज्य शासन अंगिकृत व खासगी सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावे.

00000

                                                                

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.