** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 11, 2021

आजअखेर 1 लाख 57 हजार 794 जणांना डिस्चार्ज

 


 

          कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3147 प्राप्त अहवालापैकी 3019 अहवाल निगेटिव्ह तर 123 अहवाल पॉझिटिव्ह (5 अहवाल नाकारण्यात आले ). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4308 प्राप्त अहवालापैकी 2925 अहवाल निगेटिव्ह तर 383 अहवाल पॉझिटिव्ह. (453 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 6209 प्राप्त अहवालापैकी 5193 निगेटिव्ह तर 1016 पॉझीटिव्ह असे एकूण 1522 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 32 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

          जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 76 हजार 186 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 57 हजार 794 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 13 हजार 331 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

          आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1522 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-66, भुदरगड-36, चंदगड-24, गडहिंग्लज-93, गगनबावडा-3, हातकणंगले-193, कागल-112,  करवीर-260, पन्हाळा-81, राधानगरी-42, शाहूवाडी-43, शिरोळ-126, नगरपरिषद क्षेत्र-135, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 288, इतर जिल्हा व राज्यातील-20 असा समावेश आहे.

          आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-4608, भुदरगड- 4635, चंदगड- 3611, गडहिंग्लज- 6314, गगनबावडा- 677, हातकणंगले-19424, कागल-6284, करवीर-26385, पन्हाळा-9123, राधानगरी-4278, शाहूवाडी-4135, शिरोळ- 10931, नगरपरिषद क्षेत्र-19168, कोल्हापूर महापालिका 48 हजार 093 असे एकूण  1 लाख 67 हजार 666 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 520 असे मिळून एकूण 1 लाख 76 हजार 186 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 76 हजार 186 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 57 हजार 794 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 061 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13 हजार 331 इतकी आहे.

000000

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.