** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 28, 2021

"आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र ” लोगोसाठी 10 ऑगस्टपर्यंत लोगो पाठविण्याचे आवाहन

 


 

            कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ  महाराष्ट्र स्थापन केले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (लोगो) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह तयार करुन १० ऑगस्टपर्यंत  सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत साखरे यांनी केले आहे.

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्याकरिता क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन, नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे हा राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे.

          या स्पर्धेत भारतातील नागरिकही भाग घेऊ शकतात. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना  ५० हजार, ३० हजार २० हजार रु. पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.