** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 15, 2021

आयटीआयमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

 


 

         कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) :   शासकीय आयटीआय, कळंबा येथे सत्र 2021 रिता एकूण 30 व्यवसायांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 16 जुलै  पासून  सुरु होत  आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन ITIAdmission Portal :   http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.  

प्रवेश अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर माहिती बरोबर असल्याची खात्री करुन घ्यावी व त्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क  ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे. प्रवेश शुल्क मागासवर्गीय उमेदवारांना शंभर व  सर्वसामान्य  उमेदवारांना दिडशे रू. निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जातील माहिती गोठविण्यात येईल व त्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांनी पुढील सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचा पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी एकूण सहा प्रवेश  फे-या होतील. 

 

शासकीय आयटीआय येथे प्रवेशाकरिता मार्गदर्शन कक्ष सकाळी 10 ते 11 या वेळेत स्थापन करण्यात आला आहे. सर्व उमेदवारांनी याचा लाभ घेवून प्रवेशासाठी व्यवसाय विकल्प सादर करावा. संस्थेत एकूण 31  व्यवसाय असून एक वर्ष मुदतीचे एकूण 15  व्यवसाय असून दोन वर्ष मुदतीचे एकूण  16  व्यवसाय आहेतचालू वर्षी दोन्ही मिळून एकूण 1412 जागा भरल्या जातील. प्रवेशासाठी महिलांना, मुलींना सर्व व्यवसायांत 30 टक्के आरक्षण असून मुलींसाठी  बेसिक कॉस्मालॉजी,  कर्तन शिवण, फळ भाज्या टिकवणे असे स्वतंत्र व्यवसाय अभ्यासक्रम आहेत. प्रवेशासाठी   एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. दुबार अर्ज केल्यास उमेदवार प्रवेश प्रक्रियेमध्ये अपात्र ठरला जाईल. गुणवत्तेनुसार निवड  झालेल्या उमेदवारांकडे सर्व मूळ प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. संस्थेत 450 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मुलांच्या वसतिगृहाची  सोय उपलब्ध असून, शासकीय नियमाप्रमाणे एसटी, बस पास,  रेल्वे पास सवलत तसेच इबीसी सवलत आहे.  

शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 90 टक्के तर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी 10 टक्के  जागा राखीव ठेवल्या असल्यामुळे  या प्रवेश सत्रामध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक  उमेदवारांना प्रवेशासाठी जास्त जागा उपलब्ध झाल्या आहेत.

        या संस्थेमध्ये प्रवेश 2021 साठी  एक वर्ष मुदतीचे  व दोन वर्ष मुदतीचे खालील व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

एक वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम- बेसिक कॉस्मालाजी, सुतारकाम, कॉम्प्युटर ॲप ॲण्ड प्रोग्रॅमिंग असि., फौड्रीमन, फ्रुट व्हेजीटेबल ॲण्ड प्रोसेंसिग, मेसन (बिल्डींग कन्स्टक्शन), यां.डिझेल, या.कृर्षित्र प्लॅस्टीक प्रोसे.ऑपरेटर, नळकारागीर, सुईंग टेक्नॉलॉजी, पत्रेकारागीर, स्टेनोग्राफी इं, सरफेस ऑर्नामेंटस, संधाता

दोन वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम- आरेखक स्थापत्य, आरेखक यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी, आयसीटीएसएम, यंत्रकारागीर, यंत्रकारागीर घर्षक, यां.क़ृषी व यंत्रसामुग्री, मेक मशिन टूल मेन्टनन्स, यांत्रिक मोटारगाडी, यां.प्रशितन व वातानुलीकरण, रंगारी जनरल, टूल ॲण्ड डाय मेकर, कातारी, तारतंत्री

प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक  संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होणार असून उमेदवारांनी त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.