** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 16, 2021

पंचगंगा रक्तपेढी, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित पंचगंगा रक्तपेढी, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

  शिबिरामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सहभाग नोंदवलेल्या रक्तदात्यांना वरिष्ठ भुवैज्ञानिक ऋषिराज गोसकी  यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.  

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.