कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोविड
-19 मुळे आपल्या प्रियजनांना गमविलेल्या अथवा अन्य कोणत्याही मानसिक ताण-तणावातून
जात असलेल्या व्यक्तींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग व
मुंबई प्रोजेक्ट यांच्यामध्ये सामंजंस्य करार करण्यात आला आहे. मुंबई प्रोजेक्ट
यांच्या माध्यमातून 18001024040 हा टोल फ्री क्रमांक तयार करण्यात आला असल्याची
माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती एस.डी. शिंदे यांनी पत्रकाव्दारे
दिली आहे.
समुपदेशनाची
गरज असलेल्या व्यक्तीस तज्ञ समुपदेशकांकडून ऑनलाईन सल्ला व मार्गदर्शन सुविधा
दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत देण्यात येईल.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.