** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 6, 2021

बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना

 


 

 

कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी  21 जुलै रोजी बकरी ईद असून ती अत्यंत साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याच्या सूचना  प्र. जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील.नागरिकांनी जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी  शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain,Dated 4 जून 2021 आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे  बंधनकारक  राहील. तसेच परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.