** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 21, 2021

आजअखेर 1 लाख 71 हजार 580 जणांना डिस्चार्ज

 


             कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 4280 प्राप्त अहवालापैकी 4165 अहवाल निगेटिव्ह तर 108 अहवाल पॉझिटिव्ह (7 अहवाल नाकारण्यात आला ). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 3152 प्राप्त अहवालापैकी 2897 अहवाल निगेटिव्ह तर 255 अहवाल पॉझिटिव्ह (484 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 11309 प्राप्त अहवालापैकी 10611 निगेटिव्ह तर 698 पॉझीटिव्ह असे एकूण 1061 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर एकूण 21 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

           जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 89 हजार 983 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 71 हजार 580 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 13 हजार 118 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

           आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1061 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-45, भुदरगड-14, चंदगड-14, गडहिंग्लज-50, हातकणंगले-140, कागल-132, करवीर-159, पन्हाळा-51, राधानगरी-29, शाहूवाडी-42, शिरोळ-80, नगरपरिषद क्षेत्र-87, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-159, इतर जिल्हा व राज्यातील-7 असा समावेश आहे.

           आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5129, भुदरगड- 5011, चंदगड- 3761, गडहिंग्लज- 6862, गगनबावडा- 706, हातकणंगले-21198, कागल-7275, करवीर-29083, पन्हाळा-9981, राधानगरी-4791, शाहूवाडी-4502, शिरोळ- 12060, नगरपरिषद क्षेत्र-20343, कोल्हापूर महापालिका 50 हजार 512 असे एकूण 1 लाख 81 हजार 266 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 717 असे मिळून एकूण 1 लाख 89 हजार 983 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

             जिल्ह्यातील एकूण 1 लाख 89 हजार 983 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 71 हजार 580 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 285 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13 हजार 118  इतकी आहे.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.