कोल्हापूर,दि. 6 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 3.26
टीएमसी पाणीसाठा आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी,
तेरवाड व शिरोळ हे सात आणि भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे हे चार आणि वेदगंगा
नदीवरील वाघापूर, निळपण, कुरणी, सुरुपली, बस्तवडे व चिखली हे सहा असे एकूण 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नजिकच्या कोयना
धरणात 19.30 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 32.302 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 1.25 टीएमसी, वारणा 10.50 टीएमसी, दूधगंगा 4.84 टीएमसी,
कासारी 0.94 टीएमसी, कडवी 1.15 टीएमसी, कुंभी 1 टीएमसी, पाटगाव 1.46 टीएमसी,
चिकोत्रा 0.49 टीएमसी, चित्री 0.52 टीएमसी, जंगमहट्टी 0.28 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.44
टीएमसी, कोदे (ल पा) 0.15 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 23 फूट,
सुर्वे 22 फूट, रुई 51.2 फूट, इचलकरंजी 47 फूट, तेरवाड 41 फूट, शिरोळ 33 फूट,
नृसिंहवाडी 26 फूट, राजापूर 15.6 फूट तर नजीकच्या सांगली 6.3 फूट आणि अंकली 8.6 फूट अशी आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.