** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 12, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 133.50 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 8.57 मिमी पाऊस / राधानगरी धरणात 5.29 टीएमसी ; 70 बंधारे पाण्याखाली


      पाऊस/तालुकानिहाय

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 133.50 तर
शिरोळमध्ये सर्वात कमी 8.57 मिमी पाऊस
       
            कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 133.50 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 8.57 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 10.25 मिमी एकूण 206.38 मिमी, शिरोळ- 8.57  मिमी एकूण 181.14  मिमी, पन्हाळा- 49.57 एकूण 623.43, शाहूवाडी- 52.83 मिमी एकूण 845.33 राधानगरी- 58.67 मिमी एकूण 863 मिमी, गगनबावडा- 133.50 मिमी एकूण 1891 मिमी, करवीर- 39.64 मिमी एकूण 490.82 मिमी, कागल- 48.86 मिमी एकूण 508.57  मिमी, गडहिंग्लज- 19 मिमी एकूण 387.14 मिमी, भुदरगड- 55.40 मिमी एकूण 699.80 मिमी, आजरा- 47 मिमी एकूण 948  मिमी, चंदगड- 57 मिमी एकूण 943.50 मिमी.

00000
धरण/पाणीसाठा
राधानगरी धरणात 5.29 टीएमसी ; 70 बंधारे पाण्याखाली

            कोल्हापूर,दि. 12 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 5.29 टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांभरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील : राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात, भोगावती नदीवरील : राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे हे सहा, तुळशी नदीवरील : बीड, आरे व बाचणी हे तीन, वारणा नदीवरील : चिंचोली, तांदूळवाडी, खोची, कोडोली व शिगाव हे पाच, कासारी नदीवरील : यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, वालोली, बाजारभोगांव व करंजफेण हे सहा, कुंभी नदीवरील : कळे, वेतवडे, मांडुकली व शेणवडे, सांगशी व आसळज हे सहा, कडवी नदीवरील : शिरंगाव, सवते सावर्डे, पाटणे व कोपार्डे हे चार, वेदगंगा नदीवरील : निळपण, वाघापूर, शेणगांव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली हे नऊ, हिरण्यकेशी नदीवरील : ऐनापूर, साळगांव, निलजी, खणदाळ व जरळी हे पाच, घटप्रभा नदीवरील : कानडे-सावर्डे, आडकूर, बिजूर भोगोली, हिंडगाव व पिळणी हे पाच, ताम्रपर्णी नदीवरील : चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, धोलगरवाडी, माणगांव व कोवाड हे सहा, दुधगंगा नदीवरील : दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली हे तीन, आणि धामणी नदीवरील : सुळे, आंबर्डे,मासूर्ली, गवशी व पणोरे हे पाच बंधारे पाण्याखाली गेले असून असे एकूण 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नजिकच्या कोयना धरणात 41.19 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 71.391 इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 1.84  टीएमसी, वारणा 16.42 टीएमसी, दूधगंगा 8.91 टीएमसी, कासारी 1.62 टीएमसी, कडवी 1.64 टीएमसी, कुंभी 1.44 टीएमसी, पाटगाव 2.09 टीएमसी, चिकोत्रा 0.69 टीएमसी, चित्री 0.97 टीएमसी, जंगमहट्टी 0.83 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल पा) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 37.5 फूट, सुर्वे 35.6 फूट, रुई 64.9 फूट, इचलकरंजी 62 फूट, तेरवाड 53.6 फूट, शिरोळ 46 फूट, नृसिंहवाडी 44.6 फूट, राजापूर 34 फूट तर नजीकच्या सांगली 17 फूट आणि अंकली  22 फूट अशी आहे.
000000

           


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.