** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 3, 2019

जिल्ह्यातील राधानगरी धरणात २.५९ टीएमसी पाणीसाठा




            कोल्हापूर,दि.३ (जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर २.५९ टीएमसी पाणीसाठा आहे. घटप्रभा मध्यम प्रकल्प काल दुपारीच पूर्ण क्षमतेने भरला आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात आणि भोगावती नदीवरील राशिवडे, खडक कोगे हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी १.१४ टीएमसी, वारणा ९ टीएमसी, दूधगंगा ३.४६ टीएमसी, कासारी ०.७७ टीएमसी, कडवी १.०८ टीएमसी, कुंभी ०.८६ टीएमसी, पाटगाव १.२४ टीएमसी, चिकोत्रा ०.४७ टीएमसी, चित्री ०.४० टीएमसी, जंगमहट्टी ०.१६ टीएमसी, घटप्रभा  १.५६ टीआमसी, जांबरे ०.३० टीएमसी, कोदे (ल पा) ०.१० टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम २१.९ फूट, सुर्वे २०.१० फूट, रुई ५० फूट, इचलकरंजी ४८.३ फूट, तेरवाड ४१.६ फूट, शिरोळ ३१.९ फूट, नृसिंहवाडी २६.६ फूट, राजापूर 15.3 फूट तर नजीकच्या सांगली 6 फूट आणि अंकली 7.3 फूट अशी आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.