कोल्हापूर,दि. 9 (जि.मा.का.)
: जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 4.07 टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे
लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी,
तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे
हे चार, तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे तीन, वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव,
तांदूळवाडी, खोची व कोडोली हे पाच, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन,
वालोली व बाजारभोगांव हे पाच, कुंभी नदीवरील शेनवडे व कळे हे दोन, कडवी नदीवरील
शिरंगाव, सवते सावर्डे व पाटणे हे तीन, वेदगंगा नदीवरील कुरणी, निळपण, वाघापूर,
बस्तवडे, सुरुपली व चिखली हे सहा, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, साळगांव व निजली हे
तीन, दुधगंगा नंदीवरील दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली हे तीन, आणि धामणी नदीवरील सुळे
व आंबर्डे हे दोन बंधारे पाण्याखाली गेले असून असे एकूण 43 बंधारे पाण्याखाली गेले
आहेत. नजिकच्या कोयना धरणात 31.14 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 45.425 इतका पाणीसाठा
आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 1.51 टीएमसी, वारणा 12.43 टीएमसी,
दूधगंगा 6.45 टीएमसी, कासारी 1.25 टीएमसी, कडवी 1.38 टीएमसी, कुंभी 1.25 टीएमसी,
पाटगाव 1.75 टीएमसी, चिकोत्रा 0.59 टीएमसी, चित्री 0.73 टीएमसी, जंगमहट्टी 0.56
टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.55 टीएमसी, कोदे (ल पा) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.
राजाराम 34.2 फूट, सुर्वे 32.8 फूट, रुई 62.6 फूट, इचलकरंजी 58 फूट, तेरवाड 52.6
फूट, शिरोळ 44.6 फूट, नृसिंहवाडी 43.6 फूट, राजापूर 28.3 फूट तर नजीकच्या सांगली 17
फूट आणि अंकली 21.4 फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.