कोल्हापूर,दि.2,(जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी
धरणात आज अखेर 68.88 दलघमी पाणीसाठा आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम,
सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भोगावती
नदीवरील राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत व
वेदगंगा नदीवरील वाघापूर, निळपण, कुरणी, सुरुपली व बस्तवडे हे पाच बंधारे
पाण्याखाली गेले असून एकणू 15 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 31.51 दलघमी, वारणा 249.22 दलघमी, दूधगंगा 90.27 दलघमी,
कासारी 20.56 दलघमी, कडवी 30.02 दलघमी, कुंभी 23.73 दलघमी, पाटगाव 33.50 दलघमी,
चिकोत्रा 12.76 दलघमी, चित्री 9.997 दलघमी, जंगमहट्टी 4.43 दलघमी, घटप्रभा 43.08 दलघमी,
जांबरे 5.98 दलघमी, कोदे (ल पा) 2.69 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी
पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 22.5 फूट, सुर्वे 21.4 फूट, रुई 51 फूट, इचलकरंजी 48.6
फूट, तेरवाड 42.9 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 23.9 फूट, राजापूर 15.3 फूट तर
नजीकच्या सांगली 6 फूट आणि अंकली 7.3 फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.