** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 9, 2019

अपंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्र प्रवेशास 20 जुलैपर्यंत अर्ज करावेत




       कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : तुळजा भवानी अपंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, अंध प्रौढ अस्थिव्यंगांसाठी शिवण व कर्तनकला व सौंदर्य शास्त्र प्रौढ, मुकबधीरसाठी कॉम्प्युटर टायपिंग, डी.टी.पी., टॅली, नेटवर्कींग, प्रौढ अंधांसाठी फिजीयोथेरपी प्रशिक्षण, योगा व मसाज प्रशिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
       प्रवेशितांना निवास, औषधोपचार, प्रशिक्षण साहित्याची विनामूल्य सोय केली जाणार आहे. तरी इच्छूक अपंग,मुकबधीर,मतिमंद,अंध प्रौढ मुला-मुलींनी किंवा पालकांनी दिनांक 20 जुलै 2019 पर्यंत प्राचार्य, तुळजाभवानी अपंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर समोर, देगलूर,ता.देगलूर,जि.नांदेड येथे पत्रव्यवहार किंवा समक्ष भेटावे.अधिक माहितीसाठी 9960900369, 9403207100 व 9503078767 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे  तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रांच्या प्राचार्यांनी कळविले आहे.
00000

        


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.