** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 14, 2019

राधानगरी धरणात 5.52 टीएमसी ; 21 बंधारे पाण्याखाली



            कोल्हापूर,दि. 14 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 5.52 टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प जांभरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सातभोगावती नदीवरील : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे हे चार, तुळशी नदीवरील : बीड हा एक, कासारी नदीवरील : वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व  यवलूज, हे चार, दुधगंगा नदीवरील : सुळकुड, सिध्दनेर्ली व दत्तवाड, हे तीन, वेदगंगा नदीवरील बस्तवडे चिखली हे  दोन,  बंधारे पाण्याखाली गेले असून असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नजिकच्या कोयना धरणात 43.92 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 88.24 इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 1.93  टीएमसी, वारणा 18.44 टीएमसी, दूधगंगा 9.63 टीएमसी, कासारी 1.72 टीएमसी, कडवी 1.72 टीएमसी, कुंभी 1.53 टीएमसी, पाटगाव 2.16 टीएमसी, चिकोत्रा 0.72 टीएमसी, चित्री 1.03 टीएमसी, जंगमहट्टी 0.85 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे ( पा) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 33.9 फूट, सुर्वे 33.4 फूट, रुई 64.6 फूट, इचलकरंजी 61 फूट, तेरवाड 53 फूट, शिरोळ 45.6 फूट, नृसिंहवाडी 43 फूट, राजापूर 32 फूट तर नजीकच्या सांगली 11 फूट आणि अंकली  16.9 फूट अशी आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.