कोल्हापूर,दि. 11
(जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 4.86 टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे
लघुप्रकल्प व जांभरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम,
सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी,
सरकारी कोगे, खडक कोगे व शिरगाव हे पाच, तुळशी नदीवरील बीड व आरे हे दोन, वारणा
नदीवरील चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, खोची, कोडोली व शिगाव हे सहा, कासारी
नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, वालोली, बाजारभोगांव व करंजफेण हे सहा,
कुंभी नदीवरील कळे, वेतवडे, मांडूकली व शेणवडे हे चार, कडवी नदीवरील शिरंगाव, सवते
सावर्डे व पाटणे हे तीन, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, शेणगांव, गारगोटी,
म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली हे नऊ, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर,
साळगांव व निलजी हे तीन,घटप्रभा नदीवरील कानडे-सावर्डे, आडकूर, बिजूर भोगोली व
हिंडगाव हे चार, ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, धोलगरवाडी,
माणगांव व कोवाड हे सहा, दुधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली हे तीन, आणि
धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे दोन बंधारे पाण्याखाली गेले असून असे एकूण 60
बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नजिकच्या कोयना धरणात 37.61 टीएमसी तर अल्लमट्टी
धरणात 62.18 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 1.72 टीएमसी, वारणा 14.66 टीएमसी, दूधगंगा 7.92
टीएमसी, कासारी 1.49 टीएमसी, कडवी 1.57 टीएमसी, कुंभी 1.29 टीएमसी, पाटगाव 1.95 टीएमसी,
चिकोत्रा 0.65 टीएमसी, चित्री 0.89 टीएमसी, जंगमहट्टी 0.72 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी,
जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल पा) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.
राजाराम 34.10 फूट, सुर्वे 33.8 फूट, रुई 63.3 फूट, इचलकरंजी 60 फूट, तेरवाड 52.6 फूट,
शिरोळ 44.9 फूट, नृसिंहवाडी 43.6 फूट, राजापूर 31 फूट तर नजीकच्या सांगली 15.6 फूट
आणि अंकली 20.8 फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.