कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यातील सैन्य तथा शसत्र दलातील वीरमरण आलेल्या राज्याचे
अधिवासी असणाऱ्या शहीद जवानांच्या ज्या वीर पत्नी, वीरमाता, वीरपिता व
कायदेशीर वारस यांनी सरकारी जमीन मागणीसाठी अर्ज सादर केलेले नाहीत, अशांनी
अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी केले
आहे.
सैन्य तथा सशत्र दलातील वीरमण आलेल्या
महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणाऱ्या शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीरमाता,
वीरपिता व कायदेशीर वारस यांना दोन हेक्टर शेतीयोग्य
सरकारी जमीन वाटप करण्याबाबत आदेश
निर्गमित झाले आहेत. ज्यांनी अद्याप सरकारी जमीन मागणीसाठी अर्ज सादर केलेले नाहीत,
त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बझार रोड, कसबा बावडा येथे येऊन अर्ज
सादर करावेत. सोबत आधार कार्ड, स्वत:चा
मोबाईल क्रमांक, डिसचार्ज पुस्तक, ओळखपत्र, पी पी ओ ची छायांकीत प्रत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, दूरध्वनी क्रमांक 0231- 2665812 वर
कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.