कोल्हापूर,दि. 5 (जिल्हा
माहिती कार्यालय): लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या एसटी
बसेसच्या माध्यमातून काल दिवसभरात जिल्हयातील 11 आगारातील 35 बसच्या 80 फेऱ्यातून
1 हजार 180 प्रवाशांनी प्रवास केला असून 56 हजार 116 रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची
माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी
आज दिली.
कोल्हापूर आगाराच्या कोल्हापूर-जयसिंगपूर मार्गावर 2 बसेसच्या 4 फेऱ्यातून 87 प्रवाशांनी
प्रवास केला, यामध्ये 2 हजार 570 रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-इचलकरंजी
मार्गावर एका बसच्या 8 फेऱ्यातून 107 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 5 हजार 30
रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-गडहिंग्लज मार्गावर एका बसच्या 2 फेऱ्यातून 24
प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 6 हजार 291 रूपयांचे उत्पन्न मिळाले.
संभाजीनगर आगाराच्या रंकाळा-हुपरी मार्गावर 3 बसेसच्या
12 फेऱ्यातून 183 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 3 हजार 695 रूपयांचे उत्पन्न मिळाले.
इचलकरंजी
आगाराच्या इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर 4 बसेसच्या 18 फेऱ्यातून 302
प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 10 हजार 520 रूपयांचे उत्पन्न मिळाले. गडहिंग्लज आगाराच्या गडहिंग्लज-कोल्हापूर
मार्गावर 4 बसेसच्या 8 फेऱ्यातून 142 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 15 हजार 775
रूपयांचे उत्पन्न मिळाले. गारगोटी
आगाराच्या गारगोटी-कोल्हापूर मार्गावर 2 बसेसच्या 4 फेऱ्यातून 65 प्रवाशांनी
प्रवास केला, यामध्ये 4 हजार 110 रूपयांचे उत्पन्न मिळाले. गारगोटी-मुरगूड-कोल्हापूर मार्गावर 1 बसेसच्या एका
फेरीतून 13 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 495 रूपयांचे उत्पन्न मिळाले.
कोल्हापूर-मुरगूड मार्गावर एका फेरीतून फेऱ्यातून 13 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये
650 रूपयांचे उत्पन्न मिळाले. चंदगड
आगाराच्या चंदगड-गडहिंग्लज मार्गावर एका बसच्या 4 फेऱ्यातून 28 प्रवाशांनी
प्रवास केला, यामध्ये 295 रूपयांचे उत्पन्न मिळाले.
कुरूंदवाड आगाराच्या कुरूंदवाड-जयसिंगपूर मार्गावर एका बसच्या 4 फेऱ्यातून
21 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 260 रूपयांचे उत्पन्न मिळाले. कुरूंदवाड-कोल्हापूर
मार्गावर एका बसच्या 4 फेऱ्यातून 77 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 3 हजार 425
रूपयांचे उत्पन्न मिळाले. कागल आगाराच्या
कागल-रंकाळा मार्गावर 2 बसेसच्या 4 फेऱ्यातून 38 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 885
रूपयांचे उत्पन्न मिळाले. राधानगरी
आगाराच्या कोल्हापूर-राधानगरी मार्गावर एका बसच्या 2 फेऱ्यातून 36 प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये 1
हजार 625 रूपयांचे उत्पन्न मिळाले. आजरा
आगाराच्या आजरा सोहाळे सुतगिरण मार्गावर एका बसच्या 4 फेऱ्यातून 51 प्रवाशांनी
प्रवास केला, यामध्ये 490 रूपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचेही श्री. पलंगे
म्हणाले.
000000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.