** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 5, 2020

शिवभोजन थाळीसाठी अर्ज करण्याचे आवाहन



            कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): राधानगरी तालुक्यात सुरू होत असलेल्या शिवभोजन थाळीसाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपले अर्ज तहसिलदार कार्यालय राधानगरी येथे तात्काळ सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार मीना निंबाळकर यांनी केले आहे.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी राधानगरी तालुक्यामध्ये शिवभोजन थाळी सुरू करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तालुक्यातील सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी इच्छूक सक्षम असलेल्या व्यक्ती /संस्था यापैकी अर्जदाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक व्यक्ती व संस्थांनी आपले अर्ज तहसिलदार कार्यालय राधानगरी यांच्याकडे तात्काळ सादर करावेत.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.