कोल्हापूर,दि.
7 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 665 रूग्णांपैकी 425 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 79 प्राप्त अहवालापैकी 4 अहवाल पॉझीटिव्ह तर 72
अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील 3 पॉझीटिव्ह अहवाल पुन्हा आढळून आला आहे. आजअखेर
जिल्ह्यात एकूण 232 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.
सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10 वाजेपर्यत प्राप्त 4 पॉझीटिव्ह अहवाल हे आजरा तालुक्यातील आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 69, भुदरगड- 67, चंदगड- 75,
गडहिंग्लज- 69, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 55, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहूवाडी- 169, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 657 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व
राज्यातील आठ असे मिळून एकूण 665 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 665 रूग्णांपैकी
425 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे
आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 232 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.