** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, June 7, 2020

मौ.निगवे खालसा येथील प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश मागे



कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय)  : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करवीर तालुक्यातील मौ.निगवे खालसा येथे लागू केलेला प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आजच्या आदेशाने मागे घेतला आहे.
   या आदेशात म्हटले आहे, मौ.निगवे खालसातील एका रुग्णाचे स्वॅब नमुने निगेटीव्ह आले. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याने प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश उठवावा, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मौ.निगवे खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर या गावातील लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आला आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.