** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 8, 2020

684 पैकी आजअखेर 472 रूग्णांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील




कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 684 रूग्णांपैकी 472 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 147 प्राप्त अहवालापैकी 4 अहवाल पॉझीटिव्ह तर 143 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 204 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त 4 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, भुदरगड-1, कागल-1 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र 2 असा समावेश आहे
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 72, भुदरगड- 68, चंदगड- 72, गडहिंग्लज- 77, गगनबावडा- 6, हातकणंगले- 7, कागल- 56, करवीर- 14, पन्हाळा- 25, राधानगरी- 63, शाहूवाडी- 174, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-24 असे एकूण 676 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1,  कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 684 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 684 रूग्णांपैकी 472 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 204 इतकी आहे.
0 0 0 0 0 0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.