कोल्हापूर, दि.
1 (जिल्हा माहिती कार्यालय): जून
2021 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय,
निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व
कर्मचाऱ्यांची मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष / स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे. याकरिता विभागाच्या वेबपोर्टलद्वारे
ऑनलाईन पध्दतीने 31 जुलैपर्यंत भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता,
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात
आलेले आहेत. सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाईन www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.