** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 1, 2021

आजअखेर 1 लाख 40 हजार 635 जणांना डिस्चार्ज

 

      

   कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3576 प्राप्त अहवालापैकी 3264 अहवाल निगेटिव्ह तर 312 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 8417 प्राप्त अहवालापैकी 7727 अहवाल निगेटिव्ह तर 690 अहवाल पॉझिटिव्ह. (439 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 3056 प्राप्त अहवालापैकी 2536 निगेटिव्ह तर 520 पॉझीटिव्ह  असे एकूण 1522 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 29 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 59 हजार 343 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 40 हजार 635 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 13 हजार 931 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1522 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-44, भुदरगड-36, चंदगड-13, गडहिंग्लज-87, गगनबावडा-2, हातकणंगले-168, कागल-50,  करवीर-321, पन्हाळा-108, राधानगरी-29, शाहूवाडी-11, शिरोळ-93, नगरपरिषद क्षेत्र-1116, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 420, इतर जिल्हा व राज्यातील-24 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-3969, भुदरगड- 4297, चंदगड- 3381, गडहिंग्लज- 5736, गगनबावडा- 635, हातकणंगले-17510, कागल-5311, करवीर-23079, पन्हाळा-8099, राधानगरी-3594, शाहूवाडी-3597, शिरोळ- 9742, नगरपरिषद क्षेत्र-17872, कोल्हापूर महापालिका 44 हजार 269 असे एकूण  1 लाख 51 हजार 091 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 252 असे मिळून एकूण 1 लाख 59 हजार 343 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 59 हजार 343 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 40 हजार 635 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 777 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13 हजार 931 इतकी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.