कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती
कार्यालय) : जिल्हा परिषद संचलित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी
क्रीडा प्रशाला शिंगणापूर (चंबूखडी) ता. करवीर, जि. कोल्हापूर या प्रशालेसाठी सन
2021-22 साठी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी,
खो-खो, कुस्ती व मैदानी खेळातील सुवर्ण, रौप्य, कास्य पदक विजेते खेळाडूंना
‘वाईल्डकार्ड’ एन्ट्रीव्दारे प्रशालेमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंनी www.zpkolhapur.gov.in या लिंकवर अर्ज
करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत करण्यात आले
आहे.
प्रवेशासाठी
ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ऑफलाईन फॉर्म भरण्याचा पत्ता-
राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर (चंबूखडी)
ता. करवीर, जि. कोल्हापूर असा आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.