** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 1, 2021

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी 15 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 करिता नामांकने प्रस्ताव 15 जुलै पर्यंत ऑनलाईन पोर्टलव्दारे भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

केंद्र शासनास शिफारस करण्यासाठी खेळाडूंची पुढीलप्रमाणे कामगिरी, कागदपत्रे असणे आवश्यक  आहे.

नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील म्हणजे सन 2018, 2019 व 2020 मधील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमीन, पाणी व हवेमधील तसेच लाईफ टाईम अचिव्हमेंट असणे आवश्यक आहे. खेळाडूची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे. तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2019 करिता नामांकन प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. खेळाडूंनी  वरील नमुद साहसी उपक्रमापैकी एका पुरस्कारासाठी अर्ज करावा. पुरस्कार 15 जुलै पर्यंत ऑनलाईन पोर्टलव्दारे (https://dbtyasyouth.gov.gov.in ) भरून पाठविण्याचे आहेत. या प्रस्तावाच्या दोन प्रती या कार्यालयात जमा करण्यात याव्यात.

प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाची छाननी व शिफारस करून प्रस्ताव क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. साखरे यांनी पत्रकाव्दारे दिली.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.