कोल्हापूर दि. 9 : जिल्ह्यातील सर्व एनजीओंची जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी बैठक घेवून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत आपआपल्या क्षेत्रात
सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
याबैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक,
महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अमन मित्तल, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे
आदी उपस्थित होते.
शहरातील 65 विविध क्षेत्रातील सामाजिक
संघटना उपस्थित होत्या. यासर्वांची नोंदणी करण्यात आली. त्याच बरोबर या संघटना
कोणकोणत्या क्षेत्रात काम करतात याबाबतही नोंद करण्यात आली. त्यानुसार त्यांना
आपआपल्या क्षेत्रामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
पूर ओसरल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी तसेच शिबीरांमध्ये हे काम करण्यात येणार
आहे.
याबैठकीला भारतीय किसान संघ, निसर्ग
मित्र, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्हाईट आर्मी, रेड क्रॉस, हॉटेल मालक संघटना अशा
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 65 संघटना उपस्थ्िात होत्या. या मदत कक्षासाठी
जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. राणी ताटे आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत
अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षामार्फत जिल्ह्यातील ज्या
गावांमध्ये ज्या स्वरुपाची मदत करावयाची असेल
उदा. कपडे पुरविणे, भोजन पुरविणे, वैद्यकीय सुविधा पुरविणे, मानसिक सपुदेशन
करणे, अशा त्या त्या क्षेत्रातील काम करणाऱ्या संघटनांमार्फत त्या त्या गावांमध्ये
मदत पुरविण्यात येणार आहे.
0 00 0 0 0

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.