** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 9, 2019

पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे - परिवहनमंत्री दिवाकर रावते





       कोल्हापूर, दि. 9 : पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून आवश्यक ती मदत दिली जाईल. झालेल्या नुकसानीबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा दिलासा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिला.
       परिवहन मंत्री श्री. रावते यांनी आज येथील कै.  दिलीपराव माने सांस्कृतिक हॉल, भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर शाळा क्रमांक 12 आणि बापट कॅम्प येथील पूरग्रस्तांच्या शिबीराला भेट देवून त्यांची चौकशी केली. यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, नगरसेविका कविता माने, सुनील मोदी, विजय देवणे, अनिल आवळे, पुरषोत्तम जाधव उपस्थित होते.
            परिवहन मंत्री श्री. रावते यावेळी म्हणाले, सध्या मी औषधांचा साठा सोबत आणलेला आहे. आणखीही मदत महामार्गावरील पाणी ओसरताच आपल्याला दिली जाईल. घरांची नुकसान भरपाई म्हणून शासनाने प्रत्येकी 15 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी आपल्याला करण्यात येणाऱ्या मदतीसाठी निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शिबीरामध्ये आपल्याला लागणाऱ्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. पूर ओसरल्यानंतर आपल्या पुनर्वसनाबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.  
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.