पंचगंगेच्या
पातळीत साडेतीन फुटांनी घट
249 गावांमधून 48
हजार 588 कुटुंबातील
2 लाख 33 हजार 150
जणांचे स्थलांतर
-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर
दि. 10 (जिमाका) : पंचगंगेच्या पातळीत साडेतीन
फुटांनी घट झाली आहे. पाणी ओसरतय ही दिलासा देणारी बाब आहे. आजअखेर एकूण 249 गावांमधून
48 हजार 588 कुटुंबातील 2 लाख 33 हजार 150 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात
आले आहे. यात शिरोळ तालुक्यातील 42 गावामधून 30 हजार 565 कुटुंबातील 1 लाख 52 हजार
825 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी दिली.
तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे
- कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 53 सदस्य, राधानगरी – 17 गावातील
558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य,
आजरा– 22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार
31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील
405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 30 हजार 565 कुटुंबातील 1 लाख
52 हजार 825 सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 5 हजार 993 कुटुंबातील 26 हजार 758 सदस्य,
करवीर – 35 गावातील 5 हजार 101 कुटुंबातील 23 हजार 680 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील
50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या
माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.
००००००
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.