कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का.) : आज सायंकाळी 4 वाजता अलमट्टी धरणातून 4
लाख 50 हजार क्युसेक तर राधानगरी धरणातून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे,
अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी
एस.एम.शिंदे यांनी दिली आहे.
पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील
पाणी पातळी आज सायंकाळी 4 वाजता 52 फूट 4 इंच असून एकूण 107 बंधारे पाण्याखाली गेले
आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.36 टीएमसी पाणीसाठा
आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प
पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा
नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,
सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज,
कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी
नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचणवाडी व भाटणवाडी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली,
चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर,
भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा
नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे,
मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा
नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव,
चिखली, सुक्याचीवाडी, शेळोली, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन.फ, वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर,
गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे,
आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी
नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व
ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे,
कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी, म्हसूर्ली व शेळोशी व चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे
एकूण 107 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 3.34 टीएमसी, वारणा 32.12
टीएमसी, दूधगंगा 22.78 टीएमसी, कासारी 2.52 टीएमसी, कुंभी 2.54 टीएमसी, पाटगाव 3.72
टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.
राजाराम 52.4 फूट, रुई 80.6 फूट, इचलकरंजी 77.6 फूट, तेरवाड 82.6 फूट, शिरोळ 77.10
फूट, नृसिंहवाडी 77.10 फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.