कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का.)- जिल्ह्यात
निर्माण झालेली पूरस्थिती कायम असून विविध ठिकाणी जास्त प्रमाणात व्यक्तींना
सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. नद्या, नाल्यांची पूरस्थिती गंभीर
असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अंगणवाडी, उच्च माध्यमिक तसेच
महाविद्यालयांना उद्या शनिवार दि 10 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
विविध राज्य, जिल्हा आणि ग्रामीण मार्ग बंद असल्याने वाहतुकीस अडथळा
निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यांची पातळी 52.4 फूट झाली आहे. जिल्ह्यात पूर
परिस्थिती गंभीर असल्याने उद्या शनिवारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि
महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करीत आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.