** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 8, 2019

वैद्यकीय सुविधा, गॅस, पेट्रोल-डिझेल पुरवठ्याचे नियोजन करा -पालकमंत्री चंद्रकांत पाटील


वैद्यकीय सुविधा, गॅस, पेट्रोल-डिझेल पुरवठ्याचे नियोजन करा
                                 -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
            कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : शहरातील पाणी ओसरतय ही आनंदाची बाब आहे. ओसरल्यानंतर औषध फवारणी, औषधोपचार, गॅस, पेट्रोल-डिझेल हे तात्काळ मिळावेत यासाठी आजच नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. 
        पूर ओसरल्यानंतर प्राधान्याने करावायाच्या कामकाजाबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज जिल्हा परिषदेत बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. राणी ताटे आदी उपस्थित होते.
            महामार्गावरील पाणी ओसरले की वाहनं आत येऊ शकतात याचा विचार करुन गॅस, पेट्रोल-डिझेल आदींचे टँक्र आताच मागवून ठेवा, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले पाणी ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी बरोबर, वैद्यकीय सुविधा दयाव्या लागतील. त्याचे नियोजन आताच करुन ठेवा महामार्गावर ग्रीन कॉरिडॉर करुन वाहतूक सुरु ठेवावी लागेल. स्वस्त धान्य दुकानामार्फत पुरग्रस्तांना मोफत धान्य देण्याचेही नियोजन करा, असे सांगून शिरोळ तालुक्यातील रेस्क्यू ऑपरेशनबाबत त्यांनी माहिती घेतली.
            यावेळी जिल्हाधिकारी यांनी आवश्यक ते सर्व नियोजन केले असल्याचे सांगितले. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर इमारतींच्या स्वच्छेतेसाठी आतापासूनच खासगी एजन्सीशी बोलून घ्या, अशा सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्त डॉ. मलिन्नाथ कलशेट्टी यांना दूरध्वनीवरुन दिल्या. पूरग्रस्तांना पिण्याचे पाणी आणि मेनबत्त्या पूवण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.