कोल्हापूर,दि.
5 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 653 रूग्णांपैकी 400 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर
जिल्ह्यात एकूण 247 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.
सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 59, भुदरगड- 67, चंदगड- 75,
गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 55, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहूवाडी- 169, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 645 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2, आंध्रप्रदेश-1
आणि मुंबई-1 असे इतर जिल्हा व राज्यातील आठ
असे मिळून एकूण 645 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 653 रूग्णांपैकी 400
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ
दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 247 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.