** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, June 6, 2020

661 पैकी आजअखेर 424 रूग्णांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 661 रूग्णांपैकी 424 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 115 प्राप्त अहवालापैकी 2 अहवाल पॉझीटिव्ह तर 109 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील 1 पॉझीटिव्ह अहवाल पुन्हा आढळून आला आहे तर 3 अहवाल नाकारण्यात आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 229 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त 2 पॉझीटिव्ह अहवाल हे आजरा तालुक्यातील आहे.
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 65, भुदरगड- 67, चंदगड- 75, गडहिंग्लज- 69, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 55, करवीर- 14, पन्हाळा- 25, राधानगरी- 63, शाहूवाडी- 169, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 653 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1,  कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील आठ असे मिळून एकूण 661 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 661 रूग्णांपैकी 424 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 229 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.