कोल्हापूर,दि.
7 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 680 रूग्णांपैकी 449 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 161 प्राप्त अहवालापैकी 15 अहवाल पॉझीटिव्ह तर 146
अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 223 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यत वाजेपर्यत
प्राप्त 15 पॉझीटिव्ह अहवाल हे आजरा-1,
चंदगड- 5, गडहिंग्लज- 2, हातकणंगले- 1, शाहूवाडी- 5, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1
तालुक्यातील आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 72, भुदरगड- 67, चंदगड- 72,
गडहिंग्लज- 77, गगनबावडा- 6, हातकणंगले- 7, कागल- 55, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहूवाडी- 174, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-22 असे एकूण 672 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि
आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 680 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 680 रूग्णांपैकी 449
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर
उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 223 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.