** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, June 7, 2020

रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ परिसर सीलबंद उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांचे आदेश



कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय)  : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ या परिसरामध्ये 1 कोरोनाबाधित रूग्ण आढळला आहे. त्यामुळे रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ दरम्यानचा मुख्य रस्ता व त्याला जोडणारे इतर रस्ते सीमाबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिले.
    या आदेशात म्हटले आहे, सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोराना विषाणूचे संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय-योजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होते.
   भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम - 1897 व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा निर्देशानुसार जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ दरम्यानचा मुख्य रस्ता व त्याला जोडणारे इतर रस्ते नकाशात दर्शविल्यानुसार या भागातील क्षेत्र उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर उपविभाग कोल्हापूर यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे व या क्षेत्राच्या रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्यात येत आहेत.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.