कोल्हापूर,
दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या माजी सैनिक/
पती /पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित
करण्यात येणार असून यासाठी 10 सप्टेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील
पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य,वादन इ. क्षेत्रातील
पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात
अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक
आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे,
शैक्षणिक क्षेत्रामध्ये इ. 10 वी, 12 वी च्या परीक्षेमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम
क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक/पती/पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल
धनराशी, पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी माजी सैनिकांनी संबंधित कार्याबद्दलची
प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र यासह दिनांक 10 सप्टेंबर पूवी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहिती
करिता 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. सासने यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.