** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 20, 2020

आर.टी.ई. 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांनी प्रयत्न करावेत - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे

 


कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील RTE अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. अनेक शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश शिल्लक आहेत. शाळांनी विहीत कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. येत्या 31 ऑगस्टला सदर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन लॉक म्हणजेच बंद केली जाणार असल्याचे  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे यांनी कळविले आहे.

 जिल्हयामध्ये RTE अंतर्गत 345 शाळांमधील 3486 जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. एकूण 2996 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले असून NIC सेंटर, पुणे यांच्याकडून प्रथम फेरीतील प्रवेशासाठी 2388 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.  केवळ 1016 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले असून अद्याप 1372 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित आहेत.  प्रवेश प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत राबविली जाणार आहे. उर्वरीत मुदतीत शाळांनी RTE प्रवेश प्रक्रिया राबविताना अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्रीमती उबाळे यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.