** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 20, 2020

64 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400; अलमट्टीतून 251922 क्युसेक विसर्ग सुरू

 


 

            कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 233.13 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400, कोयनेतून 11431 तर अलमट्टी धरणातून 251922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- तारळे, शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे, तुळशी नदीवरील बीड व आरे, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पणोरे, गवशी, मासुर्ली, कासारी नदीवरील- यवलूज, वालोली, पुनाळ-तिरपण व  ठाणे आवळे, कुंभी नदीवरील- सांगरूळ व कळे, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, शिगांव, मांगले सावर्डे, खोची व दानोळी, कडवी नदीवरील- सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिरगांव, सवतेसावर्डे, सरूडपाटणे, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड, सुळंबी, तुरंबे व वाळवे,  वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, घटप्रभा नदीवरील-कानडे-सावर्डे, आडकूर, बिजूरभोगोली, हिंडगाव व कानडेवाडी, ताम्रपणी नदीवरील- चंदगड, कूरतनवाडी, कोवाड, हल्लारवाडी व माणगाव असे एकूण 64 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 91.64 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 97.554 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 93.91 दलघमी, वारणा 899.01 दलघमी, दूधगंगा 668.94 दलघमी, कासारी 67.93 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 69.42 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 39.63 दलघमी, चित्री 53.414 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा  44.170  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 40.7 फूट, सुर्वे 38.8 फूट, रुई 70 फूट, इचलकरंजी 66 फूट, तेरवाड 59.6 फूट, शिरोळ 60.6 फूट, नृसिंहवाडी 60.6 फूट, राजापूर 49.6 फूट तर नजीकच्या सांगली 36.6  फूट व अंकली 42.4 फूट अशी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.