** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 18, 2020

आॕक्सीजन उत्पादक कंपन्या अधिग्रहीत करण्याचे निर्देश

वैद्यकीय कारणासाठी पुरवठा हवा;एमआयडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय इतर ठिकाणी पुरवठा केल्यास होणार गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा इशारा

कोल्हापूर, १८ दि. (जिल्हा माहिती कार्यालय)- जिल्ह्यातील पाचही आॕक्सीजन उत्पादक कंपन्या आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायद्यान्वये अधिग्रहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. या पाचही कंपन्यांनी वैद्यकीय कारणासाठी आॕक्सीजनचा पुरवठा करावयाचा असून, अन्य कारणासाठी तसेच इतर जिल्ह्यात पुरवठा करण्यासाठी एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे यांची परवानगी घ्यायची आहे. परवानगी न घेतल्यास अशा कंपन्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला आहे. याबाबत आज रात्रीपासूनच कंपन्यांच्या ठिकाणी कर्मचारी नियुक्तीची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
   कोल्हापूर आॕक्सीजन कागल, के नायट्रोजन प्रा लि-शिरोली, महालक्ष्मी गॕसेस यड्राव इचलकरंजी, देवी इंडस्ट्रीयल गॕस गोकूळ शिरगाव आणि चंद्रा उद्योग शिरोली अशा पाच आॕक्सीजन उत्पादक कंपन्या आहेत. या पाचही कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज दिले असून, एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी श्री. इंगळे यांच्या नियंत्रणाखाली तीन  शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचनाही दिली. वैद्यकीय कारणासाठी आॕक्सीजनचा पुरवठा या कंपन्यांकडून होतोय का, याची पाहणी हे कर्मचारी करतील. यासाठी आज रात्रीपासूनच या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्यातील तसेच अन्य उद्योगांसाठी पुरवठा करण्याची परवानगी श्री इंगळे यांच्याकडून घ्यावी लागेल अन्यथा अशा कंपन्यांवर गुन्हे दाखल केले जातील. या कंपन्यांवर याबाबतचे आदेश उद्या बजावण्यात येतील.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.