कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी
मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे
सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच
शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, बाचणी बंधाऱ्यावर पाणी
आल्याने शिरोली दुमालाकरिता पर्यायी मार्ग कसबा बीड, शिरोली घानवडे मार्गे वाहतुक
सुरू, इस्फूर्ली, नागाव, खेबवडे, बाचणी मार्गे वाहतुक सुरू, महे पुलावर पाणी
आल्याने सांगरूळ, आमशी, कसबा बीड व
प्रजिमा 29 मार्गे वाहतुक सुरू, कोगे बंधाऱ्यावर पाणी आल्याने कुडित्रे करिता
गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी कोगे मार्गे वाहतुक सुरू. खेबवडे
गावाजवळ पाणी आल्याने वाहतुक बंद, चिंचवाड गावाजवळ पाणी आल्याने वाहतुक बंद.
पन्हाळा
तालुक्यातील बाजारभोगाव
गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने पोहाळे-पोहाळेवाडी व मलकापूर, येळवण, मांजरे,
अणुस्कुरामार्गे वाहतुक सुरू, करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने मलकापूर, येळवण, जुगाई,
अनुस्कूरामार्गे वाहतुक सुरू, केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण
रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू, गोठे पुलावर पाणी आल्याने मल्हारपेठे, सुळे,
कोदवडे मार्गे वाहतुक सुरू, काखे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद, माजगाव पुलावर
पाणी आल्याने कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू.
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरू, माणकापूर, इचलकरंजी
पुलादरम्यान पाणी आल्याने माणकापूर, शिरदवाड, इचलकरंजीमार्गे वाहतुक सुरू,
निलेवाडी- पारगाव पुलावर पाणी आल्याने अमृतनगर,चिकोर्डे मार्गे वाहतुक सुरू,
कुंभोज आष्टा रस्त्यावर पाणी आल्याने पेठ वडगाव आष्टा मार्गे वाहतुक सुरू.
चंदगड
तालुक्यातील इब्राहिमपूर
पुलावर पाणी आल्याने कनुर गवसे मार्गे वाहतूक सुरु, चंदगड पुलावर पाणी आल्याने पाटणे फाटा, पाटणे, मोटणवाडी मार्गे वाहतुक
सुरू, करंजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद, राजगोळी,
कदनुर, कागणी, नांगरदले, मांडेदुर्ग रस्त्यावर पाणी आल्याने व पर्यायी मार्ग
नसल्याने वाहतुक बंद, माणगाव पुलावर पाणी
आल्याने तांबुळवाडी माणगाव मार्गे वाहतुक सुरू.
गडहिंग्लज
तालुक्यातील भडगाव पुलावर
पाणी आल्याने गडहिंग्लज, संकेश्वर, हत्तरगी, खानापूर, हलकर्णी, महागाव, नेसरी
मार्गे वाहतुक सुरू, निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने दुंडगे, जरळी, मुंगळी, नुल
मार्गे वाहतूक सुरु, को.प. बंधाऱ्यावर पाणी आल्याने नेसरी, हदलगे, सांबरे मार्गे
वाहतुक सुरू.
शिरोळ
तालुक्यातील शिरढोण पुलावर
पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु, हेरवाड गावाजवळ पाणी आल्याने
लाट, लटवाडी, घोसारवाड, प्रजिमा क्र. 32 मार्गे वाहतुक सुरू. नांदणी ते शिरोळ
रस्त्यावर पाणी आल्याने प्रजिमा क्र. 105 नांदणी, जयसिंगपूरमार्गे वाहतुक सुरू,
उदगाव गावाजवळ पाणी आल्याने कोल्हापूर सांगली मार्गे वाहतुक सुरू. कवठेसार गावाजवळ
पाणी आल्याने दाणोली, कुंभोज, हिंगणगाव मार्गे वाहतुक सुरू. कुरूंदवाड ते नांदणी
पुलावर पाणी आल्याने कुरूंदवाड जयसिंगपूरमार्गे वाहतुक सुरू. अंकली ते टोलनाका
रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूरमार्गे वाहतुक सुरू.
कागल
तालुक्यातील सर पिराजीराव
तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी
मार्गे वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे वाहतूक
सुरु, चिखली गावाजवळ पाणी आल्याने कौलगे, हमीदवाडा, खडकेवाडा मार्गे वाहतुक सुरू.
राधानगरी
तालुक्यातील मुरगूड गावाजवळ
पाणी आल्याने मुरगूड, चिमगाव मार्गे वाहतुक सुरू, शिरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने
तारळे, राशिवडे मार्गे वाहतूक सुरु.
गगनबावडा
तालुक्यातील शेणवडे,
अणदूर, धुंदवडे रस्त्यावर पाणी आल्याने अणदूर,मांडूकली, वेतवडे मार्गे वाहतुक
सुरू, प्रजिमा क्र. 19 वर पाणी आल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद.
आजरा
तालुक्यातील साळगाव
बंधाऱ्यावर पाणी आल्याने ओडीआर 139 सोहाळे, बाची, आजरा सुतगिरणीमार्गे वाहतूक सुरू.
शाहूवाडी
तालुक्यातील वारणा नदीवरील
आरळा शित्तुर पुलावर पाणी आल्याने तुरूकवाडी, कोकरूड, शेडगेवाडी, आरळा मार्गे वाहतुक
सुरू.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.