** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 18, 2020

जिल्ह्यातील 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे स्थलांतर

 

                     

 कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे व 16 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

                स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे करवीर तालुक्यातील बाधित 2 गावातील 1510 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

                चंदगड तालुक्यातील बाधित 1 गावातील 41 कुटुंबातील 184 व्यक्ती 16 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 8 कुटूंबातील 15 नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

                अशा जिल्ह्यातील एकूण 4 गावांमधील 1709 व्यक्तींना आणि 16 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 1 संक्रमण शिबीरात 15 जण

कोल्हापूर शहरात 1 ठिकाणी उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबीरात 5 पुरुष 9 महिला तर 1 लहान मुल अशा 15 जणांचा समावेश आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.