कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती
कार्यालय) : राधानगरी धरणात 231.35 दलघमी
पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी
धरणातून 1400, कोयनेतून 2056 तर अलमट्टी धरणातून 26922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण
क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- राजाराम, शिंगणापूर,
सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ असे एकूण 7 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 101.58 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात
123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 98.10 दलघमी, वारणा 944.05 दलघमी, दूधगंगा 712 दलघमी, कासारी 78.04
दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 72.70 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 43.08
दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा 44.170
दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल पा) 6.060 दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 19.3 फूट, सुर्वे 19.6 फूट, रुई
46.6 फूट, इचलकरंजी 43 फूट, तेरवाड 42 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 28.6 फूट,
राजापूर 18.9 फूट तर नजीकच्या सांगली 9
फूट व अंकली 11.10 फूट अशी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.