** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 17, 2020

जिल्ह्यातील 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे स्थलांतर

 


                      

 कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे व 365 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

             स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे करवीर तालुक्यातील चिखली गावातील 895 व्यक्ती 237 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गावातील 615 व्यक्ती 112 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

            चंदगड- बाधित 1 गावातील 45 कुटुंबातील 184 व्यक्ती 16 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 8 कुटूंबातील 15 नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

            अशा जिल्ह्यातील एकूण 4 गावांमधील 1709 व्यक्तींना आणि 365 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 1 संक्रमण शिबीरात 15 जण

कोल्हापूर शहरात 1 ठिकाणी उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबीरात 5 पुरुष 9 महिला तर 1 लहान मुल अशा 15 जणांचा समावेश आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.