कोल्हापूर,
दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र
पाटील-यड्रावकर यांनी आज शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील बंधाऱ्यास भेट देवून पूर
परस्थितीची पाहणी केली.श्री.यड्रावकर यांनी आज नृसिंहवाडी, कुरूंदवाड या
परिसरातीलही पूर परिस्थितीची पाहणी करून या ठिकाणी राबवायच्या उपाययोजनांबाबत
अधिकाऱ्यांना सूचना केल्या. श्री. यड्रावकर यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश
जारकीहोळी यांच्याशी आज
पुन्हा चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला
प्रतिसाद देत अलमट्टीमधून आज
2 लाख 50 हजार इतका विसर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पूरपरिस्थितीसंदर्भात
दोन्ही राज्यात समन्वय ठेवून पूर नियंत्रण केले जाईल, असे श्री. जारकीहोळी म्हणाल्याची
माहिती राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी दिली.
0000000




No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.