कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी
मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे
सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच
शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, बाचणी बंधाऱ्यावर व
कुरूकली पुलावर पाणी आल्याने इस्फूर्ली, नागाव, खेबवडे, बाचणी मार्गे वाहतुक सुरू,
महे पुलावर पाणी आल्याने सांगरूळ, आमशी, कसबा बीड व प्रजिमा 29 मार्गे वाहतुक
सुरू, कोगे बंधाऱ्यावर पाणी आल्याने कुडित्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता
बालिंगा पाडळी कोगे मार्गे वाहतुक सुरू. कुडीत्रे कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली,
नंदगाव रस्त्यावर पाणी आल्याने कुडीत्रे करिता गगनबावडा व कोगे करिता बालिंगा,
पाडळी, कोगे मार्गे वाहतुक सुरू, खेबवडे गावाजवळ पाणी आल्याने वाहतुक बंद.
पन्हाळा
तालुक्यातील केर्ली जोतिबा
रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू, गोठे पुलावर पाणी
आल्याने मल्हारपेठे, सुळे, कोदवडे मार्गे वाहतुक सुरू, काखे पुलावर पाणी आल्याने
वाहतुक बंद, माजगाव पुलावर पाणी आल्याने कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू.
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरू, रांगोळी ते
इचलकरंजी पुलादरम्यान पाणी आल्याने रेंदाळ, बोरगाव, इचलकरंजीमार्गे वाहतुक सुरू, कुंभोज
आष्टा रस्त्यावर पाणी आल्याने पेठ वडगाव आष्टा मार्गे वाहतुक सुरू, वडगाव, लाटवडे,
भेंडवडे, खोची मार्गावर पाणी आल्याने रामा.क्र. 199 मार्गे वाहतुक सुरू.
गडहिंग्लज
तालुक्यातील निलजी
बंधाऱ्यावर पाणी आल्याने दुंडगे, जरळी, मुंगळी, नुल मार्गे वाहतूक सुरु.
शिरोळ
तालुक्यातील शिरढोण पुलावर
पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु, हेरवाड गावाजवळ पाणी आल्याने
लाट, लटवाडी, घोसारवाड, प्रजिमा क्र. 32 मार्गे वाहतुक सुरू, नांदणी ते शिरोळ
रस्त्यावर पाणी आल्याने प्रजिमा क्र. 105 नांदणी, जयसिंगपूरमार्गे वाहतुक सुरू,
उदगाव गावाजवळ पाणी आल्याने कोल्हापूर सांगली मार्गे वाहतुक सुरू. कवठेसार गावाजवळ
पाणी आल्याने दाणोली, कुंभोज, हिंगणगाव मार्गे वाहतुक सुरू. कुरूंदवाड ते नांदणी
पुलावर पाणी आल्याने कुरूंदवाड जयसिंगपूरमार्गे वाहतुक सुरू. अंकली ते टोलनाका
रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूरमार्गे वाहतुक सुरू.
कागल
तालुक्यातील सर पिराजीराव
तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी
मार्गे वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे वाहतूक
सुरु, चिखली गावाजवळ पाणी आल्याने कौलगे, हमीदवाडा, खडकेवाडा मार्गे वाहतुक सुरू.
राधानगरी
तालुक्यातील शिरगाव
बंधाऱ्यावर पाणी आल्याने तारळे, राशिवडे
मार्गे वाहतूक सुरु.
गगनबावडा
तालुक्यातील शेणवडे,
अणदूर, धुंदवडे रस्त्यावर पाणी आल्याने अणदूर,मांडूकली, वेतवडे मार्गे वाहतुक सुरू.
चंदगड
तालुक्यातील माणगाव पुलावर
पाणी आल्याने तांबुळवाडी, माणगावमार्गे वाहतुक सुरू.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.