** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 16, 2020

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात चर्चा अलमट्टीतून 2 लाख क्युसेकचा विसर्ग

 

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात चर्चा

अलमट्टीतून 2 लाख क्युसेकचा विसर्ग

 

कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी आज चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून 20 हजार क्यूसेकचा विसर्ग वाढवत 2 लाख क्युसेक इतका केला आहे.

  समन्वय ठेवून दोन्ही राज्यात पूर नियंत्रण केले जाईल, असे श्री. जारकीहोळी म्हणाल्याची माहिती राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी दिली.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.